बेसिक टाईप
कॉटलीन मध्ये variable हे सगळे objects आहेत, काही केसेस मध्ये ते runtime ला त्यांच्या इंटर्नल फॉर्म मध्ये वापरले जातात, पण users साठी ते Object रुपानीच वापरता येतात. सर्वसामान्य क्लास प्रमाणेच त्यांचा वापर आपल्याला करता येतो.
आता आपण कॉटलीन मधील बेसिक टाईप ची ओळख करून घेऊयात.
नंबर
जावा प्रमाणेच कॉटलीन integer , double short हे datatypes क्लास रूपात उलपब्ध आहेत.
Type | Bit width |
---|---|
Double | 64 |
Float | 32 |
Long | 64 |
Int | 32 |
Short | 16 |
Byte | 8 |
Literal constant
Integer constant
123 हा decimal constant आहे
123L शेवटी L जोडल्यास हा long type चा constant होतो.
0x0F हा hexadecimal प्रकारचा आहे
0b0001011 हा बायनरी प्रकारचा integer constant आहे.
Octal टाईप कॉटलीन सपोर्ट करत नाही
Floating point number कॉन्स्टंट हे पुढील प्रकारे define केले जातात
125.03, 125.5e10 हे Double टाईप चे कॉन्स्टंट आहेत
1.23f , 3.1415F शेवटी जर f किंवा F जोडल्यास हे Flot type चे होतात.
वाचायला सोपे पडावे ह्या करीत underscore type numeric लिटरल देखील कॉटलीन मध्ये उपलब्ध आहेत
val oneMillion = 1_000_000
val creditCardNumber = 1234_5678_9012_3456L
val socialSecurityNumber = 999_99_9999L
val hexBytes = 0xFF_EC_DE_5E
val bytes = 0b11010010_01101001_10010100_10010010
मागची पोस्ट । अनुक्रमणिका । पुढची पोस्ट
Comments
Post a Comment