बेसिक टाईप कॉटलीन मध्ये variable हे सगळे objects आहेत, काही केसेस मध्ये ते runtime ला त्यांच्या इंटर्नल फॉर्म मध्ये वापरले जातात, पण users साठी ते Object रुपानीच वापरता येतात. सर्वसामान्य क्लास प्रमाणेच त्यांचा वापर आपल्याला करता येतो. आता आपण कॉटलीन मधील बेसिक टाईप ची ओळख करून घेऊयात. नंबर जावा प्रमाणेच कॉटलीन integer , double short हे datatypes क्लास रूपात उलपब्ध आहेत. Type Bit width Double 64 Float 32 Long 64 Int 32 Short 16 Byte 8 आणि कॉटलीन मध्ये Characters हे नंबर टाईप चे नाही आहेत. Literal constant Integer constant 123 हा decimal constant आहे 123L शेवटी L जोडल्यास हा long type चा constant होतो. 0x0F हा hexadecimal प्रकारचा आहे 0b0001011 हा बायनरी प्रकारचा integer constant आहे. ...